जळगाव : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या जळगाव जंक्शन स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी डाऊन साईडला सरकत्या जिन्यासह बोगी दर्शक फलकासह विविध सुविधा देण्यात येत आहेत. यात दिव्यांग, ज्येष्ठ प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी उद्वाहन(लिफ्ट)तसेच वरच्या बाजूस जाण्यासाठी सरकते जिने बसविण्यात आले आहेत. यात उतरण्यासाठी देखील सरकत्या जिन्यांची तसेच बोगी शयनयान व्यवस्था दर्शक बोर्डची व्यवस्था केली जात आहे.
भुसावळ विभागांतर्गत मध्य रेल्वे मार्गावर जळगाव जंक्शन स्थानकाची स्थापना स्वातंत्र्य पूर्व काळात 1860 मध्ये झाली. त्यात कालमानानुसार प्रवासी सुविधामध्ये अनेक बदल झाले असून पूर्वी चारच फलाट होते.2014 नंतर टप्प्याटप्प्याने 5 आणि 6 वा फलाट कार्यान्वित झाला आहे.
2018-19 दरम्यान टिकिट घराबाहेर, स्थानकावर जाण्यासाठी एक सरकता जिना, तसेच 2, 5 आणि 6 व्या फलाटावर जाण्यासाठी उद्वाहन (लिफ्ट) आणि 3 नंबरच्या फलाटावर सरकता जिन्याची सुविधा प्रवाशांसाठी केली आहे. लवकरच 3 नंबर फलाट तसेच बाहेरील बाजूस पोलीस चौकीच्या समोर उतरण्यासाठी देखील सरकत्या जिन्याची उभारणीचे कार्य प्रगतीपथावर असल्याची माहिती रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व फलाटांवर येणाऱ्या व जाणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्यांचे नाव नंबर, बोगी नंबरची माहिती लहान तसेच मोठ्या फ्लेक्सवर दोन ते तीन ठिकाणी दर्शवली जात आहे. आगामी काळात फलाटांच्या शेवटच्या दोन्ही बाजूस देखील लावण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक इमारतीचे देखील नूतनीकरण आगामी काळात होणार आहे. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रवासी गाड्यांची माहिती मिळण्यासाठी 12बाय18 आकारातील टिव्ही फ्लेक्स पोलीस चौकी तसेच आरक्षण कक्ष्ााच्या बाजूस उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
कौस्तुभ चौधरी, व्यवस्थापक, जळगाव रेल्वेस्थानक