जळगाव : येथील रेल्वे स्थानक परिसरात हातात लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या एकाला ३० रोजी मध्यरात्री शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन उर्फ गणेश रविंद्र चौधरी वय १९ रा. शनीपेठ, जळगाव असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ संशयित आरोपी गजानन उर्फ गणेश चौधरी हा हातात लोखंडी कोयता घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीसांना मिळाली.
त्यानुसार पथकाने शनिवारी ३० मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजता कारवाई करत संशयित आरोपी गजानन उर्फ गणेश चौधरी याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहाटे ४.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात गजानन उर्फ गणेश चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे करीत आहे.