जळगाव शहरातील शक्य असतील तितके रस्ते काँक्रीटचे करा – फडणवीस

जळगाव : शहरातील शक्य असतील तितके रस्ते काँक्रीटचे करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेत केले.

शासन आमच्या दारी या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव शहरामध्ये आले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार व जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित आहेत.

काय म्हणाले फडणवीस?
जळगाव शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून जळगाव शहरातील रस्ते चकाचक खड्डे मुक्त होणार आहेत. मागच्या वेळेस आपणही निधी दिला, मात्र सरकार बदललं. मात्र आता शहरातील रस्ते करण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे. यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेत लवकरात लवकर कामे मार्गे लावा शहरातील बहुसंख्य रस्ते हे कंपनीचे करा आणि जळगाव शहर खड्डे मुक्त करा असे आवाहन केले.