अमळनेर : तालुक्यातील कुऱ्हे येथे जागेचा वाद निर्माण करून दाम्पत्याला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने वार करून जखमी केले. शिवाय जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चौकशी अंती अखेर शनिवार रोजी अमळनेर पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे गावात प्रदिप रामसिंग पाटील वय ५३ हे आपल्या पत्नी भारती पाटील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जागेचा वाद निर्माण झाल्याने गावात राहणारे निलेश नाना पाटील, प्रेमसिंग नाना पाटील, नाना गुलाब पाटील आणि मालूबाई नाना पाटील या चौघांनी प्रदीप पाटील व त्यांची पत्नी भारती पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
दरम्यान, लोखंडी रॉड आणि चाकूने प्रदीप पाटील यांच्या वर वार करून गंभीर दुखापत करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या प्रदीप पाटील यांना अमळनेर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर अखेर शनिवारी १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.