जाणकारांचा अंदाज ठरला खरा ; दिवाळीपर्यंत सोन्याचा दर कुठवर जाणार?

जळगाव । सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार सुरूच आहे. महिन्याभरापूर्वी सोन्याचे दर ५७ हजार रुपये प्रति तोळा असताना जाणकारांनी दिवाळीत ते ६२ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. मात्र दिवाळीला दोन आठवड्याचा कालावधी असतानाच सोन्याच्या किमतीने ६२ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचा दर कुठवर जाणार याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागून आहे. मात्र  दिवाळीत सोन्याचा दर ६४ हजाराचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मागील गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर घसरून सात महिन्याच्या नीच्चांकीवर आला होता. ५७५०० रुपयावर सोन्याचा दर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र यातच इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे सोन्यासह चांदीच्या किमतीने पुन्हा मोठी उसळी घेतली.

काल शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ६०० रुपयांची वाढ होऊन ते ६२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तर चांदीच्याही भावात शनिवारी ८०० रुपयांची वाढ झाली व ती ७३ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. यापूर्वी ५ मे २०२३ रोजी सोने ६२ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते. त्यानंतर मात्र त्याचे भाव कमी झाले होते. आता पुन्हा एकदा भाववाढ होऊन साडेपाच महिन्यांनंतर सोने ६२ हजारांच्या पुढे गेले.