जाणून घ्या; घरात शूज आणि चप्पल ठेवण्याबाबत काही महत्त्वाचे नियम

तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जेचा संचार कमी होतो. वास्तूतज्ञनुसार घरात कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी एक निश्चित जागा आणि दिशा असते. या दिशांची काळजी घेतल्यास घरातून नकारात्मकता नष्ट होते. घरात शूज आणि चप्पल ठेवण्याबाबत काही महत्त्वाचे नियम जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल योग्य ठिकाणी ठेवावे असेही सांगण्यात येते. त्यासाठी ठराविक जागा निश्चित केली आहे. जर एखाद्या व्यक्तीने हे नियम पाळले नाहीत तर घरातील आर्थिक संकट आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह वाढू लागतो. इतकंच नाही तर माणसाला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल कधीही तुळशीच्या रोपाभोवती ठेवू नये. जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर घरात गरिबी येऊ शकते आणि त्रासही वाढू शकतो. इतकंच नाही तर संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. शूज आणि चप्पल घरातील बेडरूममध्ये कधीही काढू नये. वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते. असे केल्याने पती-पत्नीचे नाते बिघडू लागते.घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूट आणि चप्पल कधीही उघडू नयेत. यामुळे धनाची देवी लक्ष्मी रागावते आणि दारातून परत जाते.

स्वयंपाकघरापासूनही अंतर ठेवा. शूज आणि चप्पल स्वयंपाकघरात ठेवणे म्हणजे अन्न आणि अग्नि देवाचा अपमान करणे होय. त्यामुळे स्वयंपाकघरात चप्पल कधीही ठेवू नका. घरातील सर्व शूज आणि चप्पल एकत्र करून शू रॅकमध्ये ठेवा. यानंतर शू रॅक घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा. शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी ही दिशा शुभ मानली जाते.