---Advertisement---

जाती भेद न बाळगता सारा समाज हिंदु, हिंदु धर्माभिमान बाळगता व्हावा !

---Advertisement---

धुळे : महानगरातील वलवाडी गावानजीक श्री. हनुमान मंदीराजवळ भाजप महायुतीचे लोकसभा मतदार संघातील  उमेदवार  डॉ.  सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ “जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांना संबोधतांना धुळे विधानसभा प्रमुख अनुपभैय्या अग्रवाल यांनी उपरोक्त विधान केले.

मतदान न करता माझ्या एक मताने काय फरक पडतो. अशी भावना जर मनात ठेवली त्याचा पुष्परिणाम काय झाला हे सर्वश्रुत आहे. ती चूक परत करू नका राष्ट्रप्रेमी नागरिकांनी १०० टक्के मतदान करा. सुभाष भामरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन अनुपभैय्या अग्रवाल यांनी केले.

या प्रसंगी यशवंत येवलेकर,  नरेश आप्पा चौधरी,  सुमित पवार, दिनेश बागुल, अरूण पवार,  भिकन आप्पा वराडे, माजी सरपंच नामदेव चौधरी, पोपटआप्पा पाटील, भाईदास चोधरी, श्यामराव चौधरी, तुकाराम पाटील, बळीरामनाना पाटील, विलास चोधरी, रधुनाथ चौधरी, दिपक चौधरी, सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment