---Advertisement---

जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता

---Advertisement---

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ बैठक पार पडली. यावेळी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्यात येणार आहे. यावेळी जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.

काय आहेत निर्णय?

वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव

ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता

राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटीस मान्यता

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणार

आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ

आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.

पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन

पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार

राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता

बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय

दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार * दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ

सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ

गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता

पाकिस्तानने पकडलेल्या मासेमार्‍यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment