जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर; पात्रता जाणून घ्या..

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.  अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराने  खाली दिलेल्या पत्त्यावर 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज पाठवावा.

या भरतीद्वारे एकूण 63 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता :
1) सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार – 08
शैक्षणिक पात्रता : 
या पदावर किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा

2) सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक – 15
शैक्षणिक पात्रता :
 या पदावर किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा

3) संगणक चालक- 30
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही शाखेचा पदवीधर, संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखन करता येन आवश्यक, मराठी व इंग्रजी /लिहिता वाचता येणं आवश्यक

4) शिपाई – 10
शैक्षणिक पात्रता :
 12वी उत्तीर्ण, मराठी व इंग्रजी /लिहिता वाचता येणं आवश्यक

तुम्हाला इतका पगार मिळेल?
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार – 40,000/-
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक – 25,000/-
संगणक चालक – 16,000/-
शिपाई – 12,000/-

 
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड ४२५००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2023

भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा