जिल्हा दूध : भाजप शिंदे गटाचे 3 तर मविआ चे 2 उमेदवार विजयी

जळगाव तरुण भारत लाईव्ह | ११ डिसेंबर २०२२ | अतिशय प्रतिष्ठेची आणि अटीतटीची समजली जाणारी जिल्हा दूध संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप शिंदे गटाचे 3 तर मविआ चे 2 उमेदवार विजयी झाले आहेत.

जिल्हा दूध संघाच्या मतमोजणी चा पहिल्या टप्यात भाजपचे भटक्या विमुक्त जाती गटातून अरविंद देशमुख विजयी झाले आहेत. त्यांना 259 तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विजय रामदास पाटील यांना 179 मते मिळाली.

अनु.जाती राखीव गट- भाजपचे दुसरे उमेदवार संजय वामन सावकारे विजयी झाले, त्यांना 276 तर प्रतिस्पर्धी उमेदवार श्रावण ब्रमहें याना 161 मते मिळाली. महिला राखीव गटातून पूनम पाटील यांना 257, छाया देवकर याना 235 मते मिळाली, तर सुनीता पाटील 192, सुनीता विश्वास याना 0 मते मिळाली . इतर मागासवर्गीय गटातून पराग वसंतराव मोरे विजयी झाले, त्यांना 230 तर प्रतिस्पर्धी उमेदवार भंगाळे याना 207 मते मिळाली.