जळगाव : दूध संघाच्या संचालक मंडळाच्या स्वीकृत संचालक पदी माजी आमदार स्मिता वाघ तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांचे विश्वासू सहकारी रमेश पाटील जळकेकर यांची निवड करण्यात आली आहे.
दूध संघाची मासिक सभा १० रोजी चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आजच्या सभेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार स्मिता वाघ व रमेश पाटील जळकेकर यांची स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संजय पवार यांनी तसेच इतर मान्यवर संचालकांनी अभिनंदन केले.