जिल्ह्यातील प्रवाशांची सोय ; उद्यापासून भुसावळमार्गे पुण्याला नवीन विशेष ट्रेन धावणार

भुसावळ । भुसावळहुन पुण्याकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने होळी, धूलिवंदनानिमित्त पुणे – संबलपूर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळ मार्गे पुण्याला धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली.

०८३२७ संबळपूर- पुणे विशेष गाडी १७ ते ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी संबळपूर येथून रात्री १० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी पुणे येथे पहाटे २.४५ वाजता पोहोचेल. ही गाड्या भुसावळ स्थानकावर सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटाने पोहोचेल. तर परतीच्या वेळी ०८३२८ पुणे संबळपूर ही विशेष गाडी १९ मार्च ते २ एप्रिल या काळात प्रत्येक मंगळवारी पुणे येथून सकाळी ९.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संबळपूर येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल.परतीच्या वेळी ही गाडी भुसावळ स्थानकावर सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटाने पोहोचेल

या स्थानकांवर असणार थांबे
या गाडीला बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ़, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, लाखोली, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, नगर येथे थांबा दिला आहे.