तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। जी २० परिषदेचे ऐतिहासिक आणि यशस्वी आयोजन करत जगातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने मंजूर होणे हा भारताचा मोठा विजय ठरला. परिषदेच्या समारोपावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह त्यात स्थान देण्यासाठी भारताने आग्रही भूमिका मांडली.
परिषदेच्या पहिल्या दिवशी एक वसुधा, एक कुटुंब वर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी एक भविष्य वरील चर्चासत्रानंतर भारताने पुढील अध्यक्षपद ब्राझिलकडे सोपवले परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे भारत हा ग्लोबल लीडर असल्याचे सिद्ध झाले. दोनदिवसीय परिषदेसाठी आलेल्या जगातील प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींना भारतीय कला संस्कृती आणि विविधतेचे दर्शन झाले.
परिषदेच्या माध्यमातून भारत आखात युरोप कॉरिडॉर रेल्वे आणि शिपिंग कनेक्टिव्हीटी निर्मिती करण्याचे निश्चित झाले त्या माध्यमातून भारताच्या व्यापारवृद्धीसह आर्थिक विकासासाठी मदत होणार आहे. नवी दिल्ली जाहीरनामा पारित झाल्याने चीनचा तळतळाट झाला आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये चीन जी २० ऐवजी ब्रिक्स संगटनेला महत्व देत असल्याचे म्हटले आहे. तसेच भारत आखात यूरोप रेल्वे शिपिंग कनेक्टिव्हीटी प्रकल्पाची घोषणा हा चीनसाठी सूचक इशारा आहे.