तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। भारताच्या अध्यक्षतेत सुरू असलेल्या जी २० परिषदेत नवी दिल्ली जाहीरनामा सर्व संमतीने स्वीकृत करण्यात आला. हे घोषणापत्र स्वीकृत होणे हा देशासाठी मोठा विजय असून भारताच्या नेतृत्वावर जागतिक नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले जात आहे. जाहीरनाम्यात भारताचा नऊ वेळा उल्लेख करण्यात आला.
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने भारताच्या अध्यक्षतेखालील जी २० शिखर परिषदेचे शनिवारी दिल्लीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन ब्रिटनचे पंतप्रधान कृषी सनक यांच्यासह जगातील प्रमुख देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत परिषदेला सुरुवात झाली. प्रगती मैदानात उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य तितक्याच देखण्या आणि लक्षवेधक अशा भारत मंडप मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कित्येक राष्ट्र प्रमुखांचे स्वागत केले.
जाहीरनाम्यातील प्रमुख प्रस्ताव
सर्व देश शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करतील. भारताच्या पुढाकारात एक भविष्य आघाडी स्थापन होईल. आघाडीची स्थापना केली जाईल. आघाडीत भारत अमेरिका आणि ब्राझील संस्थापक सदस्य असतील. एक पृथ्वी एक परिवार एक भविष्य यावर जोर दिला जाईल. बहुपक्षीय विकास बँकांना बळ दिले जाईल. त्यांना अधिक कार्यक्षम केले जाईल. संदर्भात जागतिक पातळीवर धोरण निश्चित करण्यासाठी चर्चा केली जाईल. कर्ज प्रणालीसाठी आणखीन चांगली व्यवस्था निर्माण करणे वेगाने विकसित होणाऱ्या शहरांना निधी उपलब्ध करणे. हरित आणि अल्पकार्य ऊर्जा तंत्रज्ञानासाठी काम केले जाईल. दहशतवादाचा सर्व देशांकडून विरोध केला जाईल. अन्न वस्त्रांचा वापर किंवा हल्ल्याचे धमकी देणे अस्विकारहार असेल. एखाद्या देशाच्या भूभागावर ताबा घेण्याचा किंवा त्याबाबत धमकी देण्यास विरोध करणे तसेच सर्व देशांच्या सार्वभौतमाचा आदर राखणे मानवी दुःख जागतिक अन्न आणि ऊर्जा सुरक्षिततेसाठी युक्रेद मधील युद्धाच्या नकारात्मक प्रभावर प्रकाश टाकणे मध्ये व्यापक न्याय संघटन आणि दीर्घकालीन शांतता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे बुद्धिमत्तेशी संबंधित धोके लक्षात घेता त्याचा सकारात्मक वापर करण्यावर भर देणे.