जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका मद्यपीने तरुणाला मारहाण करून दुकानाचा काच फोडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात मद्यपीविरूध्द अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील आशाबाबा नगरातील रहिवासी कैलास राजेंद्र निकम वय २७ यांना रविवारी रात्री ८.४५ वाजता एका मद्यपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानाचा काच फोडला.
या प्रकरणी कैलास राजेंद्र निकम यांनी रामानंदनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार मद्यपीविरूध्द अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.