अमळनेर : राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व विभागाचे कर्मचाऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज्य सरकारी निमसरकारी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने केले आहे. उद्या दि.१८मार्च रोजी सकाळी १० वाजता पेंशन मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून निघणार असून कचेरी रोड मार्गाने तहसील कार्यालयात पोहचणार आहे.
अमळनेर तालुका सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीमार्फत तालुक्यातील सर्व जेष्ठ, श्रेष्ठ कर्मचारी बंधु तथा एनपीएस धारक बंधूंनी आपल्या न्याय हक्कासाठी पेंशन मोर्च्यात सक्रिय सहभागी व्हावे.आपल्या बंधूंसाठी जरी आपण संपात उतरला नसाल तरी पाठिंबा म्हणून मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने कळविले आहे.