---Advertisement---

जुन्या भांडणातून आधी अश्लील शिवीगाळ, नंतर घरावर दगडफेक; जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

जळगाव : जुन्या भांडणातून अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली, घरावर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार धरणगावात घडला आहे. या प्रकरणी रविवार, २४ रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिपक रतन माळी (वाघ) रा. हनुमान नगर, धरणगाव हे आपल्या परिवारासह वस्तव्याला आहे. अंडापावची गाडी लावून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्या गल्लीत राहणारा यज्ञेश दत्तात्रय पवार याने दिपक माळी यांच्या मुलीला शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दिपक माळी यांच्यासह मुलगी सृष्टी, मुलगा संघर्ष, भाऊ कैलास, वहिणी मंगलाबाई आणि आई रमणबाई महाजन यांना यज्ञेश दत्तात्रय पवार यांच्यासह त्याचे नातेवाईकांनी अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. तर इतरांना दिपक माळी यांच्या घरावर दगडफेक केली.

या मारहाणीत व दगडफेकीत संघर्ष महाजन आणि रमणबाई महाजन हे जखमी झाले आहे. याबाबत रविवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार फिर्यादीवरून यज्ञेश दत्तात्रय पवार, कन्हैय्या देवा महाजन, योगेश देवा महाजन, समाधान देविदास महाजन, पवन देविदास महाजन, निलेश रावा महाजन, किरण रावा महाजन, विनायक शिवा महाजन, देविदास मांगो महाजन, दत्तात्रय वासूदेव पवार, देवा मांगो महाजन, संजय वासूदेव पवार, सुमनबाई देवा महाजन, पुनम योगेश महाजन, आशाबाई दत्तात्रय पवार सर्व रा. धरणगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment