तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी चौकातील गणेश नगर दर्यापूर शिवारातील एका चहाच्या हॉटेलवर किरकोळ वादा नंतर प्रौढाच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत प्रमोद ज्ञानेश्वर महाजन यांचा मृत्यू झाला खून प्रकरणी संशयित आरोपी दीपक कृष्णकुमार सिंग वरणगाव ऑर्डर्स फॅक्टरी याच वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर ८१गाव पाणीपुरवठा विभागात कर्मचारी असलेले प्रमोद महाजन हे एका मित्रासोबत वरणगाव फॅक्टरी चौकातील गणेश नगर दर्यापूर शिवारातील एका चहाच्या हॉटेलवर आल्यानंतर त्यांची परिचित असलेल्या संशय दीपक सिंग सोबत भेट झाली. यावेळी गप्पांमध्ये जुना वाद उकरून निघाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली व काहींनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटल्यानंतर संशयित निघून गेला.
यावेळी महाजन हे हॉटेलमध्ये बसून वडापाव खात असताना संशय दीपक शिंगणे हा लाकडी दांडा घेऊन आला व काही ला;कळण्याच्या आतच त्यांनी प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर दांडा मारला या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजरत्न तायडे यांनी तपासून मृत घोषित केले.
पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिष कुमार अडसूळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला खून प्रकरणी मनोहर ओमकार महाजन यांच्या फिर्यादीवरून संशय दीपक कृष्णकुमार सिंग विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.