Bank Holiday in July 2023 : जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार वगळून आठ सुट्ट्या आहेत. जी 5 जुलैपासून गुरु हरगोविंदजींच्या जन्मदिनी सुरू होईल आणि 29 जुलै रोजी मोहरमच्या सुट्टीसह समाप्त होईल. काही राज्ये वगळता भारतातील सर्व बँकांना या सुट्ट्या लागू होतील.
जुलैमध्ये एकूण 15 सुट्या असतील
जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार वगळून आठ सुट्ट्या आहेत. जी 5 जुलैपासून गुरु हरगोविंदजींच्या जन्मदिनी सुरू होईल आणि 29 जुलै रोजी मोहरमच्या सुट्टीसह समाप्त होईल. काही राज्ये वगळता भारतातील सर्व बँकांना या सुट्ट्या लागू होतील. दुसरीकडे, 7 सुट्ट्या शनिवार आणि रविवारशी संबंधित आहेत. जुलै महिन्यात ५ रविवार आणि दोन शनिवार सुटी असणार आहेत. जुलै महिन्यात एकूण 15 सुट्ट्या आहेत. बँकेत कोणाचे फार महत्त्वाचे काम असेल, तर त्याचा वेळ बँकांच्या सुट्टय़ांनुसार काढावा लागतो. तथापि, एटीएम, रोख ठेवी, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
बँक सुट्टी यादी
2 जुलै 2023: रविवार
५ जुलै २०२३: गुरु हरगोविंद सिंग जयंती (जम्मू, श्रीनगर)
६ जुलै २०२३: MHIP दिवस (मिझोरम)
8 जुलै 2023: दुसरा शनिवार
9 जुलै 2023: रविवार
११ जुलै २०२३: केर पूजा (त्रिपुरा)
१३ जुलै २०२३: भानू जयंती (सिक्कीम)
16 जुलै 2023: रविवार
१७ जुलै २०२३: यू तिरोट सिंग डे (मेघालय)
२१ जुलै २०२३: ड्रुकपा त्से-झी (गंगटोक)
22 जुलै 2023: चौथा शनिवार
23 जुलै 2023: रविवार
29 जुलै 2023: मोहरम (जवळजवळ सर्व राज्यांमध्ये)
30 जुलै 2023: रविवार
३१ जुलै २०२३: हुतात्मा दिन (हरियाणा आणि पंजाब)