तरुण भारत लाईव्ह । ३० सप्टेंबर २०२३। चंद्र राशी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या शुभ दिवशी ध्रुव योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ध्रुव योगामध्ये केलेले कोणतेही कार्य नेहमीच शुभ फल देते. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे शनिवारचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
या काळात मेष राशींच्या लोकांना अडकलेला पैसा परत मिळेल. विद्यार्थ्यांना वडिलांचे सहकार्य मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मिथुन रास
या काळात कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नोकरदार लोकांना दुसर्या एखाद्या कंपनीचा कॉल येऊ शकतो, ज्याबद्दल ते विचार करू शकतात. तसेच भौतिक सुखसोयी वाढतील आणि वडिलांशी तुमचे नाते घट्ट होईल.
तूळ रास
व्यवसायात चांगली प्रगती होईल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मान – सन्मान मिळेल.