जेईई मेन, नीट, सीयूईटी – पीजी परीक्षांच्या तारखा जाहीर

तरुण भारत लाईव्ह । २० सप्टेंबर २०२३। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शैक्षणिक २०२४ – २५ साठी पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा ११ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत घेतली जाणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी सियुईटी – पीजी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा ११ ते २८ २०२४ मार्च या कालावधीत नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतली जाणार असल्याचे माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली. युजीसी – नेटची पहिल्या सत्रातील परीक्षा १० आणि २१ जून दरम्यान होणार आहे. जेईई मेन परीक्षा आयआयआयटी, एनआयटी आणि इतर सहभागी अभियांत्रिकी महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या पदवीपूर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

आयआयटी जेईई ऍडव्हान्ससाठी पात्रता परीक्षा म्हणून देखील काम करते. नीट-युजी ही देशभरातील सर्व संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी आहे. हि परीक्षा मे महिन्यात होणार आहे.