Mid Day Meal : एका सरकारी शाळेत दुपारच्या जेवणात साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. ५० हून अधिक मुलांनी हे अन्न खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलांना पोटाचे विकार, उलट्या सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, ही सर्व मुले सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1662376510723080197/photo/1
हे प्रकरण बिहारच्या अररिया जिल्ह्यातील जोगबनी नगरपरिषदेच्या अमौना माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. दुपारच्या जेवणात साप आढळला होता. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो मुलांचे नातेवाईक शाळेत पोहोचले होते. घाईगडबडीत सर्व मुलांना उपचारासाठी फारबिसगंजच्या उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत सांगितले जाते की, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास स्वयंसेवी संस्थेने शाळेत शिजवलेले अन्न आणले होते. सुमारे दीडशे मुलांनी जेवणही केले होते. एनजीओच्या भांड्यातून अन्न बाहेर काढून इतर मुलांना द्यायचे होते. यावेळी जेवणात मृत साप आढळल्याने शाळेत खळबळ उडाली. याप्रकरणी तपासासाठी पथक स्थापन करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र कुमार यांनी दिली.