जेवण केलं अन् तरुणानं रात्रीच नको तो निर्णय घेतला; जळगावमधील घटना

जळगाव: तालुक्यातील कुसुंबा येथील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत युवकाचे नाव आहे.  आज रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, तरुणाचे आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आईवडील आणि लहान बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्याच्या वडिलांचे गॅरेजचा व्यवसाय आहे. तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करत होता. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तेजस हा आईवडील आणि बहिण यांच्यासोबत जेवण केले. आणि झोपण्यासाठी ते वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत गेला. दरम्यान, मध्यरात्री त्याने सुताची दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सकाळी वडील धोंडू पाटील हे तरुणाला उठविण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सदाब सय्यद करीत आहे.