‘जे घडलं ते…’ अजित पवारांच्या शपथविधीवर मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले फडणवीस?
महाराष्ट्रामध्ये  विकासाचा आम्ही नवा अध्याय लिहू. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि मी तिघे मिळून महाराष्ट्राल पुढे नेऊ. महाराष्ट्राचा विकास करणारे सरकार आम्ही देऊ. जे घडलं ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी घडलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आता आपल्याकडे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन बनले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत आहे. अजित पवारांचा अनुभव महाराष्ट्राला बळकट करण्यास मदत करेल.

महाराष्ट्राच्या राजकारणावर देशातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत बोलत होते ती लोकशाहीची जननी हीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.