सातार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले, जोपर्यंत मोदी जिवंत आहे, संविधान बदलू देणार नाही, असा विश्वास पीएम मोदींनी दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचे सरकार ३ कोटी भगिनींना करोडपती बनवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक घरात आणि शेतात पाणी पोहोचले पाहिजे हा मोदींचा संकल्प आहे.
आम्ही शेतीमध्ये सहकारी संस्था विकसित करत आहोत, त्यामुळे सरकारमध्ये यासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले आहे. तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे व्हिजन मोदींकडे असल्याचे ते म्हणाले.
मी तुमच्या स्वप्नाची हमी देतो. आज आपले सरकार गरजूंना मोफत रेशन देत आहे आणि पुढील 5 वर्षांसाठी आणखी हमी देत आहे. काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, पूर्वीची सरकारे धान्य गोदामात बंद ठेवत असत. त्यानंतर सुप्रीम कोर्टही या प्रकरणी बोलले होते, पण असे असतानाही न्यायालयाने या प्रकरणी बोलू नये, असे मनमोहन सिंग म्हणाले होते. तुमच्या शेतांचा, जमिनींचा आणि मंगळसूत्राचा एक्स-रे करणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.