ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने.. ; आमदार मंगेश चव्हाणांचा उन्मेष पाटीलांवर घणाघात

जळगाव । माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी भाजप आमदार तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांच्यावर आरोप करत जोरदार टीका केली. आता त्यांच्या या टीकेला आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्त्युत्तर दिले. “आमच्या मतदारसंघात या माणसाला कुत्र सुद्धा विचारत नाही ही परिस्थिती आहे. गाईला आई मानन्याची आमची संस्कृती आहे. आईच्या गायीच्या दुधात पैसे चोरणारी आम्ही औलाद नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्या उन्मेष पाटील यांनी गायीची भाड खाल्ली”, असा घणाघात मंगेश चव्हाण यांनी केला.

भुसावळ येथे जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेदरम्यान बोलताना मंगेश चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली. “उन्मेष पाटील यांना आता शेतकरी आठवतो आहे का? त्यांच्या काळात पूर आले तेव्हा शेतकरी दिसला नाही. 10 वर्षात त्यांना गाय दिसली नाही, दूध दिसलं नाही. त्यांना कळालं की आता अडचणीतला दूध संघ त्यांनी नफ्यात आणला. शेतकऱ्यांचे उदो उदो करतील म्हणून श्रेय घेण्यासाठी त्यांनी केलं”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.

चाळीसगावला कत्तलखाना उभारायला त्याला सर्व परवानगी याने दिल्या. त्याने पैसे कसे घेतले, किती घेतले, हे सर्व मी तुम्हाला कागदपत्रांशी पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकवू नये”, अशा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिला.

यावेळी मंगेश चव्हाण यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही प्रतिक्रिया दिली. “तीन वर्षात चारदा पक्ष सोडणे आणि पक्ष बदलणारा माणूस किती मोठा असू शकतो. प्रवेश कुठे झाला, काय झाला, याबाबत आम्हाला तर वरिष्ठांनी काही सूचना दिल्या नाहीत. त्यांच्यावर बोलण्या इतपत एवढा मोठा माणूस मी नाही. त्यांची निष्ठा किती आहे? तीन वर्षात चार वेळा पक्ष सोडणे आणि पक्ष बदलवणारा माणूस, किती मोठा असू शकतो त्यावर मी काय बोलू?”, अशी प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी दिली.