झणझणीत झुणका रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ९ सप्टेंबर २०२३। पावसाळ्यात मस्त जेवायला काहीतरी झणझणीत खायला लागत. मग अशावेळी तुम्ही झुणका करू शकतात आणि तुम्ही झुणका पोळीसोबत तसेच भाकरी त्याचबरोबर भातासोबत खाऊ शकता. झुणका कसा बनवतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
तेल, मोहरी, हिंग, लसूण, कांदा, पाणी, बेसन, कोथिंबीर, तिखट.

कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहोरी, चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला लसूण घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी.यानंतर या फोडणीमध्ये  बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट घालावं. त्यानंतर त्यात बेसन पीठ घालावे, बेसन घातल्यानंतर ते २ ते ३ मिनिटे चांगले भाजून फोडणीमध्ये एकजीव करुन घ्यावे.आता हाताच्या ओंजळीत थोडे थोडे पाणी घेऊन ते या झुणक्यामध्ये सोडावे. मग झुणक्याचे छोटे छोटे गोल गठ्ठे होईपर्यंत झुणका शिजवून घ्यावा.