नवापूर : आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात विविध व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी प्रथम पुष्पगुंपण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.गौरी पाटील, प्रमुख अतिथी म्हणून प्रीती हिवराळे , वर्षा वसावे, नीलिमा माळी आणि फिलिप गावित हे उपस्थित होते.
एम.के.डी जुनिअर कॉलेज येथील प्राध्यापक प्रीती हिवराळे यांनी विद्यार्थ्यांना ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर उद्बोधन करताना अतिरिक्त झालेला ताण कसा कमी करता येईल यावर प्रकाशझोत टाकला. माध्यमिक विद्यालय आमलान येथील उपक्रमशील शिक्षिका वर्षा वसावे यांनी आनंदी जीवनाचे सूत्र आदिवासी लेकरांच्या शिक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला सुद्धा शहरातील जीवनशैली प्रमाणे खूप चांगले जीवन जगता येईल असे मत व्यक्त केले.
जोशाबा सरकार युवा मंडळाच्या सचिव, योग आणि निसर्गोपचार तज्ञ तथा मानसशास्त्रीय समुपदेशक नीलिमा माळी यांनी दैनंदिन जीवनातील व्याधींना दूर करण्यासाठी निसर्गोपचारासारखा दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन केले. अध्यक्ष भाषणात डॉ गौरी पाटील यांनी आपल्या जीवनशैलीतील अविभाज्य घटक म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार हे असल्याचे मत प्रकट केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गावित प्रास्ताविक सोनाली गावित आभार महेश गावीत यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची कार्यक्रमाधिकारी डॉ नितीनकुमार माळी प्रा फीलीप गावित रेहान शेख विशाल वळवी, मितल वसावे, फिलिप गावित, सोनाली गावित, सुलभा पाडवी, रोशनी वसावे, यांनी प्रयत्न केले.