झारखंडमध्ये चंपाई सोरेनच मुख्यमंत्री, विश्वासदर्शक जिंकला ठराव

झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर ‘झामुमो’चे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर राज्यपालांनी चंपाई सरकारला बहुमत साध्य करण्यास सांगितले. यानुसार आज ५ रोजी सोरेन सरकारने ४७ आमदारांच्या पाठींब्याने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर विधानसभेत आवाजी मतदाने चंपाई सोरेन सरकारवर पुन्हा शिक्कामोर्तब झाला. अखेर झारखंड मुक्ती मोर्चाला सरकार अबाधित ठेवण्यात यश आले आहे.