टीम इंडियाचा आफ्रिकेत डंका; आफ्रिकेने गमावली 8वी विकेट

South Africa Vs India 1st ODI Live : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहेत. या मालिकेतील पहिला सामना रविवारी जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेत केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. या मालिकेत भारताने आपल्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंचा समावेश असलेला संघ निवडला आहे.

दक्षिण आफ्रिकेला 17व्या षटकात 73 धावांवर आठवा धक्का बसला आहे. आवेश खानने डेव्हिड मिलरनंतर केशव महाराजला आऊट केले. आणि सामन्यात चौथी विकेट घेतली. अर्शदीप सिंगनेही चार विकेट घेतल्या आहेत.