टीम इंडियाने २७ वर्षांनंतर मालिका गमावली; इकडे राहुल द्रविड चर्चेत

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तब्बल २७ वर्षांनंतर पहिल्यांदा मालिका गमावली. यानंतर आता टीम इंडियाच माजी कोच राहुल द्रविड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राहुल द्रविड याने टीम इंडियाच्या कोचपदाची नोव्हेंबर 2021 ते जून 2024 पर्यंत जबाबदारी पार पाडली. टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यावर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी गौतम गंभीर यांच्याकडे करण्यात आलीय.

दरम्यान, राहुल द्रविज कोच असताना टीम इंडियाने आयसीसीच्या तीन फायनलमध्ये धडक मारली. मात्र यामधील फक्त टी-20 वर्ल्ड कपमध्येच विजेतेपद जिंकता आलं होतं. वन डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा घरच्या मैदानावर (नरेंद्र मोदी स्टेडयम) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. अशातच राहुलने तो कोच असताना सर्वात जास्त वाईट कोणता सामना हरल्यावर वाटलं ? यावर बोलताना त्याने आयसीसी ट्रॉफी जिंकण्यापासून एक पाऊल दूर असलेला सामना सांगितला.

काय म्हणाला राहुल द्रविड ?

दक्षिण आफ्रिकेमध्ये टीम इंडियाने कधीच मालिका जिंकली नव्हती. त्यामुळे ती मालिक जिंकणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकत नव्हता. पण आम्ही विजयाच्या जवळ होतो. माझ्यासाठी कोच म्हणून हा सर्वात कठीण काळ होता कारण मालिकेत पुढे असूनही आम्ही विजयापासून वंचित राहिलो, पण तिथून खूप काही शिकायला मिळाल्याचं राहुल द्रविड म्हणाला.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका गमावल्याने सर्वात जास्त वाईट वाटल्याचं राहुल द्रविड म्हणाला. टीम इंडिया 2021 मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी गेली होती. या मालिकेमध्ये पहिला सामना जिंकत आघाडी घेतल्यावरही आफ्रिकेने 2-1 ने मालिका जिंकली होती. भारताने पहिली कसोटी 113 धावांनी जिंकली पण त्यानंतरच्या दोन्ही कसोटी सामन्यात सात विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाचा हेड कोच म्हणून राहुल द्रविड याचा तो पहिलाच विदेश दौरा होता. तयावेळी विराट कोहलीची कर्णधार म्हणून शेवटची कसोटी मालिका होती.