Cricket : वनडे वर्ल्ड कप 2007 मध्ये टीम इंडियाला पराभवाचा हिसका दाखवणारा बांगलदेशचा अनुभवी फलंदाजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, यामुळे बांगलादेशला मोठा झटका लागला आहे.
कोणता फलंदाज?
तमीम इक्बाल याने आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कप 2023 आधी निवृत्ती जाहीर केली आहे. तमीम इक्बाल याने बांगलादेशचं कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉरमेटम ध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.
तमीमने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 70 कसोटी, 241 एकदिवसीय आणि 78 टी 20 सामने खेळले आहेत. तमीमने कसोटीमध्ये 5 हजार 134 धावा केल्या आहेत. तर टी 20 क्रिकेटमध्ये इक्बालच्या नावे 1 हजार 758 धावांची नोंद आहे. तर तमीमच्या नावावर बांगलादेशसाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम आहे. तमीमने वनडे क्रिकेटमध्ये 8 हजार 313 धावा केल्या आहेत.