टेन्शन घेण्यापेक्षा खोटं हसून वाढवा आयुष्य, खळखळून हसण्याचे हजारो फायदे

सर्वप्रकारच्या आजारावर हरणे हा उत्तम पर्यांय मानला जातो. धावपळीच्या जीवनात आपण हसणे विसरतो. पण तुम्हाला माहित आहे का तुमचे छोटेसे स्मित हास्य तुमच्यासाठी आणि इतरांदेखील आनंदी बनवू शकते.

निरोगी आरोग्यासाठी

निरोगी राहण्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम हवा आणि योग्य अन्न आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तुमचे हसणे देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जे लोक राग दाबून ठेवतात किंवा मनात ठेवतात त्यांच्यात तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी वाढते. अशा व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येतो.

ऑक्सिजनचा साठा

मोकळेपणाने हसल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो. जे हृदयाचे पंपिंग रेट योग्य राखण्यास मदत करते.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोज हसल्याने तुमचे आरोग्य तर चांगले राहतेच पण त्यामुळे शरीरात ऊर्जाही टिकून राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हसण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जी अनेक रोगांशी लढण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी हसणे खूप महत्त्वाचे आहे.

​शांत झोप येण्यास मदत

रात्री सहज झोप येत नसेल तर आजपासूनच हसायला सुरुवात करा. हसण्यामुळे शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार होते, जे आपल्याला शांत झोप देण्यास मदत करते.
म्हातारपणी कोणतीच चिंता नाही​

जे लोक मोकळेपणाने आयुष्य जगतात ते म्हातारपण आनंदाने घालवतात. अशा वृद्धांना कोणतीच गोष्टी करताना अडचणी येत नाही.
​मूड चांगला राहतो

तुम्ही खोटे हसत असलात तरी ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की खोट्या हसतानाही तुमचे अनेक स्नायू काम करतात आणि तुम्हाला आराम वाटतो. हसण्यामुळे शरीरात आनंदाचे हार्मोन्स देखील बाहेर पडतात, ज्यामुळे व्यक्तीचा मूड चांगला राहतो.
तरूण दिसण्यासाठी

प्रत्येकाला तरुण आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते. जर तुम्हीही त्यापैकीच असाल तर मनमोकळेपणाने हसायला सुरुवात करा. कारण जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील स्नायू चांगले काम करू लागतात. त्यामुळे चेहऱ्याभोवती चांगले रक्ताभिसरण होते. ज्यामुळे आपण तरुण आणि सुंदर दिसतो.