टोमॅटोची भाववाढ : वस्तुस्थिती आणि विपर्यास!

– गिरीश शेरेकर
tomato price rise टोमॅटो हे नाव स्पॅनिश शब्द टोमॅटे यापासून मिळाले आहे. पण, टोमॅटोला त्याचे सध्याचे स्वरूप हे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राप्त झाले असावे. भारताला पोर्तुगीजांनी टोमॅटोची ओळख करून दिली. ब्रिटिश काळातच टोमॅटोची लागवड भारतात वाढली. विदेशातून आलेले हे टोमॅटो भारतीयांच्या दैनंदिन खाद्यवस्तूतला एक महत्त्वाचा भाग कसे झाले, हे आजही कोणाला समजलेले नाही. tomato price rise चिंचेला पर्याय म्हणून भारतात टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. संपूर्ण भारतात टोमॅटो नावानेच ते परिचित असले तरी महाराष्ट्रासह काही राज्यांत त्याला ‘टमाटर’ नावानेच ओळखले जाते. tomato price rise सध्या हे टमाटर भाववाढीमुळे संपूर्ण देशात प्रचंड चर्चेत आहे. भारतात मूलभूत समस्यांची जेवढी चर्चा होत नाही, त्यापेक्षा किती तरी जास्त एखाद्या खाद्यवस्तूची चर्चा त्याची भाववाढ झाल्यावर होते. कांद्याच्या चर्चेचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. कोणतेही तथ्य समोर न ठेवता फालतू चर्चा घडवून आणणारी एक जमात देशात सक्रिय आहे. tomato price rise ती जमातच वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून टोमॅटोची चर्चा घडवून आणत आहे

tomato price rise सर्वसाधारणपणे जून व जुलै महिन्यात टोमॅटोच्या किमतीत वाढ होतेच. पण, यंदा ती थोडी जास्तच आहे. या वाढीमागची प्रमुख तीन कारणे सांगितली जातात. पहिले म्हणजे तापमानवाढ आणि हवामानबदल, दुसरे म्हणजे अनियमित आणि अवकाळी पाऊस आणि तिसरे म्हणजे दक्षिण व मध्य भारतात टोमॅटो पिकावर झालेला रोगाचा प्रादुर्भाव. ही भाववाढ ऑगस्टपर्यंत कमी होईल. कारण, खरिपातले उत्पादन बाजारात येणार आहे. tomato price rise टोमॅटोची लागवड खरीप आणि रबी अशा दोन्ही हंगामात केली जाते. आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि तामिळनाडू या राज्यांत टोमॅटोची सर्वाधिक लागवड होते. ते प्रमाण ९१ टक्के आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये रबी हंगामातही टोमॅटोचे पीक घेतले जाते. tomato price rise देशभरातील साधारण ५ लाख हेक्टर क्षेत्र रबी टोमॅटो अंतर्गत येते, तर साधारण ८.९ लाख हेक्टर खरीप टोमॅटो अंतर्गत येते. रबीचे पीक साधारण हिवाळ्यात घेतले जाते, तर खरीप पीक जून-जुलैमध्ये पेरणी करून ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये काढले जाते. लागवड केल्यापासून सुमारे अडीच महिन्यांत टोमॅटो तयार होतात.

मार्च आणि ऑगस्टला ते बाजारात येतात. tomato price rise यंदा उष्णतेच्या लाटेमुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यामुळेच मार्च-एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटोच्या किमती घसरल्या. आता त्याची मागणी तेवढीच आहे पण, नुकसान झाल्याने पुरवठा कमी झाला आहे. टोमॅटोच्या किमती वाढण्यामागचे अजून एक मुख्य कारण म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील त्याच्या पिकावर आलेला रोग. तापमानवाढ आणि अवकाळी पाऊस यामुळे एका विशिष्ट प्रजातीच्या पांढèया, छोट्या किड्यांची वाढ झाली असून या किडीचा पिकावर प्रादुर्भाव झाला आहे. tomato price rise या रोगामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घसरण झाली आणि किमती वाढायला लागल्या. दक्षिण भारतातून उर्वरित भारताला टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. त्यात उत्तर भारतात पडलेल्या अवकाळी पावसामुळेदेखील दक्षिण भारतातून टोमॅटो आयात करण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वाभाविकपणे मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र बिघडले की दर कमी-जास्त होतात. टोमॅटोच्या बाबतीत वेगळे काहीच घडलेले नाही. tomato price rise महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तांनी टोमॅटो भाववाढीचा आढावा घेतल्यावर उपरोक्त कारणेच त्यांच्यासमोर आली.

राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६-५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर तर रबी व उन्हाळी हंगामात साधारणपणे १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते. वेगवेगळ्या कारणामुळे ते घटले आहे. सध्या शेतक-यांनी नवीन टोमॅटोची लागवड केली आहे. लवकरच म्हणजे ऑगस्टच्या शेवटी नवीन टोमॅटो बाजारात येण्याची शक्यता आहे. tomato price rise टोमॅटो हे काही जीवनावश्यक खाद्यवस्तू नाही. काही नैसर्गिक कारणांमुळे भाववाढ झाली असेल तर ती डोक्यावर घेण्याची गरज नाही. केंद्र व राज्य सरकारे त्यासाठी दोषी नाहीत. विद्यमान स्थितीत ज्यांना टोमॅटो घेणे शक्य आहे ते घेऊन चवीने खात आहेत. ज्यांना शक्य असूनही घ्यायचेच नाही ते फक्त चर्चा करत आहे. tomato price rise ज्यांना अजिबातच शक्य नाही त्यांनी टोमॅटोचे गुणधर्म असलेली आणि खाद्यपदार्थांत टोमॅटोचेच काम करणा-या अन्य खाद्यवस्तूंचा उपयोग करावा. चर्चाच करायची असेल तर देशात अनेक सामाजिक प्रश्न आहेत, त्यावर करावी.
९४२०७२१२२५