---Advertisement---

ठाकरे गटाचं काय होणार? आता काय घडलं, वाचा सविस्तर

---Advertisement---

मुंबई : महापालिकेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचं काय होणार? अश्या चर्चांना जोर यायला लागला आहे.

उद्धव ठाकरे यांची सोबत सोडून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत घरोबा केला. त्यानंतर विधानपरिषदेतील आमदारांचीही गळती सुरु झाली. विप्लव बाजोरिया, मनीषा कायंदे आणि त्यापाठोपाठ उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर, उद्धव ठाकरे यांच्या महापालिकेतील नगरसेविका शीतल म्हात्रे, यशवंत जाधव यांच्यासारख्या महत्वाच्या मोहऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशीच सभागृह नेत्या तृष्ण विश्वासराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका शिलेदाराने शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली ही अनोखी गिफ्टच म्हणावी लागेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment