ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस आली आहे. ठाकरे गटाच्या प्रचारातील मशाल गीतावरून ही नोटीस आली आहे. या प्रचार गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे दोन शब्द वगळण्याची सूचना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द वगळणार नसल्याचं सांगतानाच आम्ही या प्रकरणी कायदेशीर लढाई लढू, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाला आलेल्या या नोटिशीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी गाण्यात तरी जय भवानी शब्द का वापरावा ? असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.
ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; काय आहे प्रकरण
Updated On: एप्रिल 29, 2024 10:57 am

---Advertisement---