---Advertisement---

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, काय घडलं

---Advertisement---
मुंबई : ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाच्या ओबीसी सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे नेते अरुण दुधवडकर यांच्याकडे दिला आहे.

पावसकर यांनी राजीनामा देताना दिलेल्या पत्रकात लिहले आहे की, गेली अनेक वर्ष मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ओबीसी सेलचा जिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहे. संघटना वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र फिरून लोकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम मी केले, मात्र आता पक्षातील राजकीय कुरघोड्यांना मी कंटाळलो आहे. अंतर्गत राजकारणामुळे काम करण्याचा उत्साह राहत नाही.त्यामुळे आज मी माझ्या पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment