नवी दिल्ली । LPG सिलिंडरच्या नवीन किमती महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केल्या जातात. यावेळी १ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्या तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
इतक्या रुपयाची झाली वाढ
1 डिसेंबरपर्यंत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन किमतींनुसार राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 1796.50 रुपयांनी महागला आहे. तर देशातील आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1728.00 रुपयांवरुन 1749.00 रुपये झाली आहे.
आजपासून नवीन दर लागू
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. यासोबतच देशातील सर्व शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या नव्या किमतीही लागू झाल्या आहेत. गेल्या महिन्यात दिवाळीपूर्वी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या होत्या. त्यावेळी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १०३ रुपयांनी कमी केली होती.
बड्या शहरातील दर
आजच्या 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1796.50 रुपये झाली आहे. तर आधी त्याची किंमत 1755.50 रुपये होती. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1908 रुपयांपर्यंत वाढली आहे. यापूर्वी येथे 19 किलोचा सिलेंडर 1885.50 रुपयांना मिळत होता. दुसरीकडे, मायानगर मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1749 रुपये झाली आहे, जी पूर्वी येथे 1728 रुपयांना मिळत होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1968.50 रुपये झाली आहे, यापूर्वी त्याची किंमत चेन्नईमध्ये 1942 रुपये होती.