तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसताना डीजीज एक्सच्या रोगाने डोकेवर काढले आहे. हा आजार कोरोनापेक्षा ७ पट वेगाने पसरतो. आरोग्य एजन्सी आणि जागतिक आरोग्य संघटना ने याबाबत लोकांना सावध केले आहे.
तज्ज्ञांच्या मते एक्स रोगाची लक्षणे ही लवकर दिसू शकतात. हा विषाणू वेगाने उत्परिवर्तित होत आहे. ज्यामुळे हा रोग पसरु शकतो. केट बिंघम यांनी म्हटले की, १९१८ ते १९ मध्ये एक महामारी आली होती, ज्यामुळे ५ कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी X रोगाची लस तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ज्यामुळे या आजाराशी लढा देता येईल. लसीच्या प्रभावातून यावर नियंत्रण मिळवता येईल. या आजारावर शास्त्रज्ञांनी आतापर्यंत २५ विषाणूंचा अभ्यास केला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, हवामान बदलामुळे अनेक आजार वेगाने पसरत आहे. प्राण्यांशी वाढलेला संपर्क मानवांसाठी धोकादायक ठरु शकतो.