डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले, काही वेळानंतर रुग्ण उठून बेडवर बसला, नेमकं काय घडलं?

नाशिक: येथील जिल्हा रुग्णालयात एक व्यक्ती उपचार घेत होता. उपचार घेत असताना डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. काही वेळाने ती व्यक्ती बेडवर उठून बसली. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांना धक्का बसला. काही लोकांनी तिथून काढता पाय घेतला, तर काही लोकं घाबरुन बाहेर पळाली. तिथं डॉक्टर उपस्थित झाल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीवर उपचार सुरु केल्याची माहिती मिळाली आहे.

सुत्रानुसार, एक रुग्ण 93 टक्के भाजला होता, त्याला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्या रुग्णावरती तिथं अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यावेळी तिथं असलेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने त्या रुग्णाला मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाईकांची तिथं रडारडी सुरु झाली. नातेवाईकांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. त्यानंतर काही वेळाने रुग्ण बेडवर उठून बसला, अशी माहिती मिळाली. ज्यावेळी रुग्ण उठून बसल्याची माहिती मिळाली, त्यावेळी तिथं पुन्हा उपचार करण्यात आले.

दरम्यान, रात्री भाजलेल्या व्यक्तीला मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा वाद होण्याची परिस्थिती ओढावली होती. हे प्रकरण जिल्ह्यात सगळीकडे माहिती झाल्यामुळे याची चर्चा सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी आदेश दिले आहेत.