डॉमिनोजची मोठी भेट; पिझ्झाच्या किमतीत इतक्या टक्क्यांनी कपात

तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। येत्या ५ ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट वर्ल्डकप सुरु होत आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण वर्ल्डकप  भारतात होत आहे. अशातच डॉमिनोज ने ग्राहकांना दिलासा दिला आहे. आपल्यापेक्षा लहान आणि नवीन कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी डोमिनोजने वर्ल्डकपपूर्वी मोठ्या आकाराच्या पिझ्झाच्या किमतीत मोठी कपात केली आहे.

डॉमिनोजने आपल्या मोठ्या आकाराच्या पिझ्झाची किंमत ४० टक्क्यांनी कमी केली आहे. सोबतच कंपनीने दररोजच्या ऑफरवर मोठ्या कपातीची घोषणा केली. डॉमिनोजने व्हेज लार्ज पिझ्झाची किंमत थेट ७९९ रुपयांवरून ४९९ रुपयांपर्यंत कमी केली आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठीही एक आनंदाची बातमी आहे. डॉमिनोजने नॉनव्हेज लार्ज साईज पिझ्झाची किंमत ९१९ रुपयांवरून ५४९ रुपयांपर्यंत कमी केली आहे.

गेल्या काही वर्षांत लोकांच्या उत्पन्नात वाढ आणि जीवनशैलीत सुधारणा झाल्यानंतर लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढली. मात्र, वाढत्या महागाईमुळे लोकांचा खर्च कमी होत आहे. भारतातील डॉमिनोजसार‘या कंपन्यांसाठी हे वर्ष चांगले राहिले नाही. भविष्यात या ब्रॅण्ड्स समोरील आव्हाने वाढताना दिसत आहेत. कारण, डॉमिनोजचा सेल यावर्षी कमी झाला आहे. डोमिनोजने पिझ्झा हट आणि बर्गर किंग यासारख्या फास्ट फूड ब्रॅण्ड्सना त्यांचे दर बदलण्यास भाग पाडले आहे. कारण, डोमिनोजने पिझ्झाच्या किमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या कंपन्यांना त्यांचा बाजारातील हिस्सा कायम ठेवायचा आहे.