नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी ‘गाव चलो अभियान’ राबवितांना नंदुरबार लोकसभा क्षेत्रांतर्गत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील नाशिंदा येथे तसेच भोवतालच्या परिसरात प्रवासी कार्यकर्ता म्हणून भेट दिली.
या भेटीत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून महाविजय २०२४ साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले. ठीक ठिकाणी महिलांशी युवकांशी तसेच ग्रामस्थांशी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी संवाद साधला व बैठक घेऊनही मोदी सरकारने राबवलेल्या योजनांविषयी तसेच महाराष्ट्र सरकारने बेघर बेरोजगार महिला आत्मनिर्भरता आदिवासी समाजासह दुर्लक्षित घटकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राबवलेल्या योजना यांची माहिती दिली.
यावेळी जि.प.सदस्य शांताराम पाटिल माजी जि.प.सदस्य भिकाबापू पाटिल विखरणचे सरपंच रोहिदास मराठे, माजी सरपंच केशव पाटिल, सुजालपूर उपसरपंच प्रल्हाद भाई, बोराळ्याचे सरपंच तुंबाआण्णा, नारायणभाई, हाटमोईदा माजी सरपंच उमाकांत भाई, जगदिश पाटिल यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.