नंदुरबार : केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार दलित आदिवासी आणि वंचित घटकांच्या पाठीशी भक्कम उभे आहे त्यामुळेच गावागावात रस्ते वीज पाणी यासह मोठ्या विकासाची कामे होताना दिसली त्याबद्दल लोकांमध्ये एक विश्वास आहे म्हणून कोणीही काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता विकासाला साथ द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी विविध गावांमधून केलेल्या संपर्कात प्रसंगी केले.
लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार डॉ हिना गावित यांच्या प्रचारार्थ दिनांक 8 मे रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील फेस, बामखेडा, वडाळी, जयनगर, काहटूळ, कवठळ, मनरद, धुरखेडा, बुपकरी, कनजाई, डामरखेडा या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी मतदारांना लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ हिना गावित यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची विनंती देखील केली.
तर नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळे परिसरात संपर्क दौरा करून घरोघर भेटी देत प्रचार केला.
विशेषतः महिलांशी संवाद केला. गावापासून दिल्लीपर्यंत कोणतेही काम असो ते करून दाखवले मागील पन्नास वर्षात झाले नाहीत इतकी विकास कामे गेल्या दहा वर्षात पार पडली यामागे महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित आणि आमचे मार्गदर्शक मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे व्हिजन असल्याचे डॉ. सुप्रिया गावित यांनी याप्रसंगी सांगितले.