नंदुरबार : राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नंदुरबारमध्ये विळा-भोपळ्याचे नाते आहेत. शिवसेना नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारमध्ये उमेदवार बदलावा, अशी मागणी केली होती. मात्र, महायुतीने डॉ. हिना गावित यांनाच उमेदवारी दिल्याने नाराज असलेले शिवसेना नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची आज शनिवारी डॉ. हिना गावित यांनी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. दरम्यान, या भेटीमुळे डॉ.हिना गावित आणि चंद्रकांत रघुवंशी यांचे मनोमिलन झाले, अशा चर्चांना उधाण आले आहे.