डॉ. हिना गावित की गोवाल पाडवी; नंदुरबारात कोण मारणार बाजी ?

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीची नंदुरबारसह महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया आता संपली आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. त्या नंदुरबार मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान आता मतदान संपले असून, ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्याविरूद्ध काँग्रेसचे ऍड. गोवाल पाडवी यांच्यात लढत रंगली. महायुती व मविआच्या नेत्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा करण्यात येत आहे. असे असले नक्की कुणाचा विजय होईल हे ४ जून रोजी कळणार आहे.

१३,९२, ६३५ मतदारांनी बजावला हक्क
नंदुरबार मतदारसंघात १९ लाख ७० हजार ३२७ मतदार होते. त्यापैकी १३ लाख ९२ हजार ६३५ मतदारांनी मतदान केले.

११ उमेदवार रिंगणात
नंदुरबार मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात मुख्य लढत ही महायुती विरुद्ध मविआमध्येच रंगली.