नाशिक : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी भिडे गुरुजींच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तसेच भिडे गुरुजींनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मंत्री छगन भुजबळ आज नाशिक शहरात असून पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. मंत्री भुजबळ म्हणले की, “खरं म्हणजे संभाजी भिडे यांच्यावर आम्हीसुद्धा एक केस दाखल केली आहे. आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल या वक्तव्यावर कोर्टात ती केस सुरु आहे. महात्मा फुले यांच्यावर ते टीका करतात, पण महात्मा गांधी यांच्यावर देखील ते अत्यंत गलिच्छ पद्धतीने ते टीका करतात, मला खात्री आहे, पंतप्रधान मोदी किंवा अमित शाह कुणालाही हे आवडणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “महात्मा गांधींना अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो, जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही. त्यांच्यावर गलिच्छ स्वरुपात टीका करतात. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे” असे भुजबळ म्हणाले. पण कडक कारवाई होत नाही, म्हणून ते रोज नवीन नवीन काहीतरी बोलतात. काल ते पंडित नेहरुंनी देशासाठी काही योगदान नाही असं ते म्हणाले. पण त्यांचे वडीस देशातील सर्वात श्रीमंत वकील त्यांनी देशासाठी सर्व काही दिलं, स्वःत नेहरप साडे अकरा वर्ष नेहरु तुरुंगात राहिलेत, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांची स्तुती करु नका, पण असली टीका मला आवडत नाही. आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात कोर्टात आहे. पण कोर्टात तारीख वेळेवर मिळत नाही. मला कधी-कधी वाटतं की मनोहर भिडे यांचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही, तेच मला कळत नाही” असेही छगन भुजबळ म्हणाले.