डोक्यात लोखंडी रॉड टाकल्याने महिला गंभीर जखमी ; जळगावातील घटना

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव ः शहरातील वाघ नगरातील महिलेला काही कारण नसताना एकाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याची घटना रामानंदनगर घाटाजवळ घडली. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील वाघ नगर परिसरातील पूनम प्रभाकर जाधव (३८) या महिला परीवारासह वास्तव्याला असून सोमवारी सकाळी ११ वाजता त्या रामानंद नगर परिसरातील घाटाजवळून पायी जात असताना प्रज्ञा ऍटो गॅरेज येथे संशयित सिध्दार्थ भाऊसिंग सैंदाणे (रा.श्रीधर नगर, जळगाव) याने काहीही कारण नसताना महिलेच्या कानशिलात लगावत शिविगाळ करून हातातील लोखंडी रॉड डोक्यात टाकला. यात महिला गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी महिलेने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्याने संशयित आरोपी सिध्दार्थ भाऊसिंग जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.