ड्रग्ज माफिया ललित पाटिल चे नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडुन खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला. ललित पाटिल हा ठाकरे गटात आहे. यावरुन भाजप आ. नितेश राणेंनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावरन सुरूवात करावी, असा थेट इशाराच राणेंनी दिला आहे.
नितेश राणे म्हणाले, “नाशिक मध्ये संजय राऊत ड्रग्ज व अमली पदार्थ विरोधात उबाठाच्या टवाळक्याना घेऊन मोर्चा काढत आहे. सामना मध्ये अग्रलेख लिहिला आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर किती दगड मारावे त्याला मर्यादा आहेत. नाईट लाईफ, ड्रग अमली पदार्थ म्हटले की संजय राऊतच्या मालकाच्या मुलाचे नाव येते. ड्रग मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावरन सुरवात करावी. अभिनेता दिनोच्या घरी धिंगाणा कोण घालत होता? जुन्या महापौर बंगल्यात कोविड चे टेंडर भरण्यासाठी कोणाची बैठक झाली? खेर नावाची अभिनेत्री त्या बंगल्यात का यायची?” असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.
“दिनोच्या घरी कोणाच्या वाइन चा ग्लास भरला जायचा? राऊत ने मालकाच्या मुलाला विचारून उत्तर द्यावे. मंत्रालयात दारूच्या बॉटल सापडलेल्या त्या कोणाच्या होत्या? म्हणून नाशिक मध्ये नको तर मातोश्रीवर मोर्चा काढ. अभिनेत्रींच्या खुनाच्या बाबतीत आदित्य ठाकरे चा काही ना काही रोल आहे. म्हणून त्याला कोर्टात जावं लागलं. राऊत ने आपला थोबाड बंद केलं नाही तर उडता मातोश्री मध्ये काय काय होत तो चित्रपट समोर आणू. बमबम भोले गाणे कोणाच्या घरी वाजत ते सांगू. तेव्हा तुझ्या मालकाचा मुलगा तुला चपलीने मारेल.” असं नितेश राणे म्हणाले.