---Advertisement---

तयार होतोय त्रिग्रही योग; या राशींना होणार फायदाच फायदा

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। ठराविक काळानंतर काही ग्रह हे राशीबदल करत असतात. त्यामुळे एकाच राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. आता येत्या एक ऑक्टोबरला कन्या राशीत तीन ग्रहांची युती होणार असून  त्रिग्रही योग तयार होत आहे. या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मिथुन रास
या काळात मिथुन राशीच्या लोकांना अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. विद्यार्थाना शिक्षण क्षेत्रात चांगली संधी  मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे.

सिंह रास
या काळात सिंह राशीच्या लोकांना अनेक प्रकारे लाभ होऊ शकतात. संततीकडून शुभवार्ता समजतील. वाहन खरेदीचा योग जुळून येईल. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल.

धनु रास
या काळात धनु राशींच्या लोकांना जीवनात सकारात्मक बदल दिसतील. हाती घेतलेलं काम लगेच पूर्ण कराल. नवीन व्यवसाय सुरु करण्यास योग्य वेळ आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment