तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुधाची युती कन्या राशीत होत आहे. सूर्य, बुध, शुक्र, मंगळ, राहु, केतु हे ग्रह राशी बदल करणार आहेत. त्यामुळे राशीचक्रावर त्याचा परिणाम दिसून येईल. बुध ग्रह स्वरास असलेल्या कन्येत प्रवेश करणार आहे. यामुळे शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
वृषभ रास
या काळात या राशींच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. आर्थिक प्रगती होईल. व्यापारात फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह रास
या काळात सिंह राशींच्या लोकांना सकारात्मक बदल दिसून येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. व्यवसायात भरभराट होईल. मुलांकडून सुवार्ता समजतील.
धनु रास
या काळात धनु राशींच्या लोकांना शिक्षणात प्रगती दिसून येईल. मान – सन्मान मिळेल. आत्मविश्वास वाढेल.